विजय शिंदे
महाराष्ट्र विधानपरिषदेतील ११ आमदार आज गुरुवारी २७ जुलै रोजी निवृत्त झाले. त्यानंतर विधानपरिषदेतील ५ जागा भाजपला मिळणार आहेत. या जागांसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
भाजपच्या ५ जागांवर कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपकडून ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार सुरु आहे. त्यामुळे भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला संधी मिळणार,याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार सुरु आहे. भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर इतर ४ जागांसाठी १० नावे चर्चेत आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाचा विचार सुरु आहे. चार जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानपरिषदेच्या उमेदवारांची संभाव्य यादी –
रावसाहेब दानवे
पंकजा मुंडे
हर्षवर्धन पाटील
चित्रा वाघ
परिणय फुके
निलय नाईक
योगेश टिळेकर
माधवी नाईक
सुधाकर कोहळे
अमित गोरखे