विजय शिंदे
अतिवृष्टी व दुष्काळ नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदन इंदापूर तालुका शिवसेनेच्या(UBT) वतीने इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टी व दुष्काळाचे सावट होते. त्यासाठी राज्य शासनाने मदत जाहीर केले ती मदत इंदापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अद्याप बाकी आहे अशा तक्रारी शिवसेना कार्यालय मध्ये येत आहेत तरी आपणास विनंती. राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अतीवृष्टी व दुष्काळ नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच वर्ग करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.
या निवेदनावर जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, संजय काळे भीमराव भोसले, तालुकाप्रमुख नितीन शिंदे, सुजाता सोनवणे,सचिन इंगळे, योगेश कणसे, सुरज सानप यांच्या सही आहेत.