विजय शिंदे
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून, या जागांसाठी भारतीय जनता पक्षाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके,अमित गोरखे सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.
जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.