विजय शिंदे
इंदापूर: डिकसळ ( ता.इंदापुर) येथे बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सोमवार ( ता.१) रोजी विद्यार्थ्यांना वह्या पेन व इतर शालेय साहित्याचे त्याचबरोबर फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांच्या मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक रमेश बाबा धवडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष धनंजय थोरात, डाळज ( ता.इंदापुर) येथील माजी उपसरपंच मनोहर हगारे, आप्पासाहेब गायकवाड, उपस्थित होते. यावेळी सरपंच मनिषा गवळी यांनी सुप्रिया सुळे यांच्या खासदार फंडातून शाळेच्या व गावच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाकाऱ्यांनी सरपंच गवळी यांच्या विकास निधीच्या मागणीचे सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच मनीषा गवळी यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्या मंदा शिंदे, अंगणवाडी सेविका सुनीता कदम, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर काळे, सुभाष चव्हाण, सचिन पोंदकुले शितलकुमार हगारे, ऋषिकेश अनिल काळे, आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती सुरेखा वाघ यांनी प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक तथा इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीचे सभापती सतीश दराडे यांनी केले तर आभार पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी मानले.