विजय शिंदे
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. भाजपसाठी ‘सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली’ पुतण्या खासदार करून माढा हा आमचा बालेकिल्ला असल्याचा मोहिते पाटलांनी दाखवून दिले. त्याच धर्तीवर इंदापुरातही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेला बंडखोरी करावी असं आग्रह कार्यकर्ते करत आहेत.
राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपल्या आहेत. त्यातच इंदापूर मध्ये भाजप कार्यकर्ते कामाला लागले असून अनेक कार्यकर्त्यांनी विमान या चिन्हाचे टेटस ठेवून लागा तयारीला असे लिहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यास इंदापुरात बंडाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे.
इंदापुरात समीकरणे बदलली..
विधान परिषदेचेच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळून इंदापुरातील महायुतीतील वाद थांबेल अशी शक्यता होती. परंतु हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळाली नसल्याने इंदापूर विधानसभेची गणिते बिघडले आहेत. महायुतीकडून विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे की हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळणार यावरून इंदापूर तालुक्यातील राजकीय गणिते अवलंबून राहतील.
इंदापुरात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल यामध्ये हर्षवर्धन पाटील अपक्ष लढल्यास इंदापूर मध्ये तिरंगी लढत निश्चित आहे, यावेळी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरेल हे निश्चित.