इंदापुरात महायुती मध्ये “बॅनर वॉर” हडपसर, परळी मतदारसंघातील वाद मिटला इंदापुरात काय.?

विजय शिंदे

विधानसभेचे उमेदवारी जाहीर होण्याआधीच इंदापुरात महायुतीतील दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर सुरू झाले आहे.माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी आमचा स्वाभिमान आमचे विमान …आमचं आता ठरलंय… लागा तयारीला विधानसभा २०२४ अशा आशयाचे बॅनर लावले होते.तर त्याच ठिकाणी इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनात विकासाची परंपरा कायम राखूया चला विजयाची हॅट्रिक पूर्ण करूया… आमच ठरत नसतं आमचं फिक्स असतं …मिशन २०२४…आमचा स्वाभिमान दत्तात्रय भरणे… अशा आशयाचे बॅनर लावले आहे.

विधानसभेच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, उमेदवारांसंदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र आपल्याच नेत्याला उमेदवारी मिळावी यासाठी स्पर्धा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11जागेसाठी उमेदवारांची निवड ही पाहता भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्यामध्ये  महायुती होणार हे निश्चित झाले आहे. हडपसर या मतदार संघात अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत त्यांची जागा निश्चित करण्यासाठी भाजपने माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेवर घेतले. त्यामुळे हडपसर चा प्रश्न मिटला, परळी येथे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कट्टर विरोधक माजी मंत्री पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांची जागा ही निश्चित केली, तसाच प्रश्न इंदापूर मध्ये आहे विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असल्याने ही जागा निश्चितच महायुतीकडून दत्तात्रय भरणे यांना मिळणार. याची चाहूल इंदापुरात भाजप कार्यकर्त्यांना लागली असून आत्तापासूनच अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेच कार्यकर्ते हातात हात घालून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचा प्रचार करताना दिसून आले मात्र लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेतली असली तरी कार्यकर्ते मात्र ॲक्टिव मूड वर आल्याचे दिसून येते.

महायुतीतील इंदापूर विधानसभेचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार घेतील यावर नेते ठाम असले तरी कार्यकर्ते मात्र आपल्याच नेत्याचे “फिक्स” आहे असे ठामपणे सांगत असताना दिसून येत आहेत.लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी केलेली मदत उपमुख्यमंत्री अजित पवार परतफेड कशी करणार पाहणे महत्वाचे ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here