विजय शिंदे
माळवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक पै दत्ताभाऊ पांढरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर,पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिता पाटील- ठाकरे व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दत्तात्रय पांढरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्तात्रय पांढरे मित्र परिवाराच्या वतीने माळवाडी येथे केक कापून शुभेच्छा दिल्या. इंदापूर तालुक्यात वृक्षारोपण, शालेय साहित्यांचे वाटप असे विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी पांढरे यांना शुभेच्छा दिल्या.