गौरव शिंदे
इंदापूर शहरामध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पालखीचे १० जुलै रोजी इंदापुरात आगमन होत आहे त्यानिमित्त इंदापूर नगरपालिकेतर्फे जय्यत तयारी केली जात असून पालखी स्थळाजवळील अकलूज नाका ते आय टी आय परिसरात स्वच्छता करण्यात आली.
त्याप्रसंगी नगर पालिकेचे सर्व कर्मचारी व अधिकारी वर्ग यांच्यासह इंदापूरनगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे हे देखील यामध्ये सामील झाले होते.