विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीचा निकाल आला अन् महायुतीत कलगीतुरा रंगला. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या गेल्या. घटक पक्षांतील अनेक नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवून झालेल्या अवस्थेस जबाबदार असल्याची टीका केली गेली.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस चांगलेच भडकले. त्यांनी महायुतीतील वाचाळवीरांना उद्देशून कडक भाषेत सुनावले आहे.
मुंबईतील षणमुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय महायुतीच्या नेत्यांचेही कान टोचले. यावेळी फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीत विसंवाद असल्याची कबुलीच दिली.
ते म्हणाले, सर्वपक्षीयांना सांगतो, की आपल्या एकमेकांमध्ये विसंवाद आहे. प्रवक्ते काय बोलतायत ते बघा. त्यातूनही खुमखुमी असेल तर आपल्या नेत्यांना विचारा आणि खुमखुमी पूर्ण करा, अशा शब्दांत वाचाळवीर प्रवक्त्यांना फडणवीसांनी ठणकावले आहे.