विजय शिंदे
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येते आणि या अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. तीन लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज सवलत दिली जाते.
शासनाकडून प्राप्त निधी शेतक्त्यांच्या खात्यावर वर्ग…
या योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली असून शासनाकडून प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. या व्याज सवलत योजनेचा 2023-24 या वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या 1 लाख 96 हजार 696 शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज सवलतीपोटी 43 कोटी 41 लाख 02 हजार 614 रुपयांचा या योजनेंतर्गत लाभ देण्यात येत आहे. अश्याप्रकरे महाराष्ट्र ग्रामीण बँक या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना व्याज मिळवून देण्यात राज्यात अव्वल ठरली आहे.
तसेच याअगोदर बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्य शासनाकडून मिळणारे १ टक्का व्याज सवलतीपोटी 3 लाख 53 हजार 317 शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 कोटी 44 लाख 29 हजार 18 रुपये जमा केले आहेत आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या ३१ मार्चवर केंद्र शासनाकडून मिळणारे ३ टक्के व्याज सवलत रक्कम २ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अश्याप्रकरे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने व्याज सवलत म्हणून नियमित कर्जफेड करणाऱ्या २ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० कोटी रुपयाचा लाभ देत० टक्के व्याज दराने पीक कर्जमिळत आहे.
व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतक-यांकडून पीक कर्जाची मुदतीत परतफेड.
यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक कृषी निविष्ठा, बियाणे, खते, औषधे खरेदी करता येणार आहेत. यातून शेती उत्पादनात वाढ होणार आहे. तसेच व्याज सवलत मिळवण्यसाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करत आहेत. त्यामुळं बँकांची वसुली वाढून आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यास मदत होत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँके कडून या आर्थिक वर्षात 3 लाख 08 हजार 113 शेतकऱ्यांना 2786.15 कोटीचे विक्रमी पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अग्रणी बँकेचे उद्दिष्टं 123.42% पूर्ण केले आहे. बँकेने आपल्या शेतकरी बांधवांचे कर्ज नियमित करून घेण्यासाठी महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना व महाग्रमीन किसान सन्मान योजना कार्यान्वित करीत व्याजात भरघोस सुट उपलब्ध करुन दिली आहे. सदरील दोन्ही योजने अंतर्गत आत्तापर्यंत एकूण १५००० शेतकरी जवळपास ६० कोटी रुपयांची सवलत घेऊन मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत. तसेच या योजने करीत पात्र असलेल्या शेतकऱ्यानं पैकी १ लाख २५ हजार शेतकरी ज्यांच्या साठी बँकेनी ३०० कोटीची तरतूद करून ठेवली आहे, तरी या योजने अंतर्गत पात्र शेतकरी अद्याप वंचित आहेत. तसेच या योजना ३१ मार्च नंतर बंद होणार आहेत तरी सर्व पात्र शेतकरी बांधवांनी आपले पीक कर्ज खाते नियमित करून घ्यावे त्यासाठी आपल्याला नजीकच्या शाखेशी संपर्क करावा असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांनी केले आहे.