विजय शिंदे
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज इंदापूर या ठिकाणी मुक्कामी आला असून सर्व वारकरी बांधवांना स्वर्गीय मंगेश (बाबा पाटील) प्रतिष्ठान च्या वतीने दरवर्षीप्रमाणे फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक शेखर पाटील, नितीन म्हस्के, विकास बलदोटा, निलेश बोरा, अभिजीत पाटील, संकेत पाटील, ओंकार पावशे तसेच प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्तित होते.
स्वर्गीय मंगेश (बाबा पाटील) प्रतिष्ठान हे इंदापूर शहरात दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत असते, सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमाची परंपरा कायम ठेवत प्रतिष्ठानच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला.