विजय शिंदे
निळोबाच्या जयघोषात व टाळ, मृदुंगाच्या गजरात संत परंपरेतील अखेरचे संत निळोबाराय महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी (दि.१०) रोजी इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे मुक्कामासाठी दाखल झाला.
यावेळी सरपंच सिताराम जानकर,उपसरपंच व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे, ग्रामसेवक सतीश धायगुडे, सतीश चित्राव यांच्यासोबत सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी पालखी रथाचे स्वागत केले.
श्री संत निळोबाराय पालखी रथाचे श्रीक्षेत्र पिंपळनेर (पारनेर) येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.यावेळी सनई चौघड्याच्या मंगलमय सूरांनी सरडेवाडी येथील वातावरण भक्तिमय झाले होते. सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या दिंड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
निळोबाराय देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोकराव सावंत, पालखी सोहळा प्रमुख,संत निळोबारायांचे वंशज ह.भ.प गोपाळबुवा महाराज मकाशिर यावेळी उपस्थित होते.