विजय शिंदे
जाहिरात लेखन
मा श्री प्रशांत मामा उंबरे
युवा नेते इंदापूर
एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्या चा आज(१४जुलै )वाढदिवस आहे. अगदी कमी वयात रवींद्रशेठ सरडे यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. वडील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वामनराव सरडे यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही वडिलांकडूनच मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्रशेठ सरडे यांचा आज (१४ जुलै) वाढदिवस, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या रवीशेठ यांना वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
किसी मक्सद के लिए खडे हो तो एक पेड की तरह
गिरे भी तो बीज की तरह,
ताकि दुबारा उगकर उसी मक्सद के लिए जंग कर सके..
काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील पूर्व भागातील तसेच काटी -वडापुरी जिल्हा परिषद गटातील मतदारसंघाचे युवा नेते परिसरातील लाडके रवीशेठ म्हणून ज्यांची ख्याती आहे. आपली धडाकेबाज कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, अशा सर्वच पातळीवर केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे. रवीशेठ यांना मी तसं पाहतोय ते सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करतात त्याच बरोबर एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे.
सरडेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य, विद्यमान उपसरपंच, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशी विविध पदे त्यांनी भूषवली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी व भाजपची ताकद मोठी महत्त्वाचे दोन्ही पक्ष एकत्र असताना अगदी कमी वेळेत प्रचाराची यंत्रणा राबवत रवीशेठ यांनी जोरदार “तुतारी” वाजवली. खासदार सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातून मताधिक्य मिळत असताना सर्वात जास्त मताधिक्य काटी -वडापुरी गटातून मिळाले यामध्ये रवीशेठ सरडे यांचे योगदान महत्त्वाचे.
येणाऱ्या काळात पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी रवींद्र सरडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते मागणी करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका पातळीवरील तसेच वरिष्ठ नेते रवींद्र सरडे यांना संधी देतील व काटी-वडापुरी गटातील “तुतारीची” जागा निश्चित करतील अशी आशा आहे..