झगडेवाडीतील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, तुम्ही ऑफलाईन अर्ज भरून द्या ,ग्रामपंचायत ऑनलाईन अर्ज भरणार.!!

विजय शिंदे

राज्यसरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची अंमलबजावणी राज्यभरात वेगाने सुरू आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट ही अंतिम मुदत ठेवली आहे.


मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांच्या बॅंक खात्यात दर महिन्याला थेट १५०० रुपये जमा होणार असल्याने महिला वर्गाने या योजनेचे जोरदार स्वागत केले आहे. या योजनेसाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने गावा-गावात योजनेची नोंद करण्यासाठी महिलांची अक्षरश:झुंबड उडाली आहे.

ही योजना गावात शंभर टक्के राबवावी या उद्देशाने इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी या गावाने १३ व १४ जुलै रोजी एक कॅम्पचे आयोजन केले आहे, यासाठी गावातील काही कार्यकर्ते शासकीय कर्मचारी हे लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ऑफलाईन अर्ज देतील ते अर्ज दोन दिवसात भरून ग्रामपंचायत कडे देण्याचे आहेत. हे अर्ज ऑनलाईन करण्याचे काम ग्रामपंचायत करणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत घेणार आहे.

यावेळी बोलताना सरपंच अतुल झगडे म्हणाले सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना ग्रामस्थांना व महिला वर्गांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, सर्वर डाऊन असल्याने ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येतात यासाठी आम्ही गावातील सर्व पात्र लाभार्थी महिलांचे ऑफलाइन अर्ज भरून घेत असून ते ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतने घेतली आहे. त्यामुळे सर्व पात्र महिला भगिनींचे अर्ज ऑनलाईन केल्याशिवाय ग्रामपंचायत प्रशासन स्वस्त बसणार नाही.

यावेळी ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी प्रयत्नशील असून काही अडचण असल्यास संपर्क करण्याचे आवाहन यावेळी झगडे यांनी केले.

आवश्यक असणारी कागदपत्रे.

1-आधार कार्ड झेरॉक्स
2-अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला /15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड /15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ( यापैकी कोणतेही एक )
3- उत्पन्न दाखला/ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
4- अर्जदाराचे हमीपत्र
5- बँक पासबुक
6- अर्जदाराचा फोटो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here