हर्षवर्धन पाटील भाजपात नाराज.?

विजय शिंदे

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात आलेल्या अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत नेते सावध भूमिका घेताना दिसून येत आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील स्वागताच्या बॅनर वरून भाजप नेत्यांचे फोटो हटवल्यानंतर तसेच कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यात लावलेल्या “विकास आघाडीच्या” बॅनर वरून चर्चेत आलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून अजून एक पोस्ट व्हायरल होत आहे.

भाजपाचे जेष्ट नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सद्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना आता सोशल मिडियात व्हायरल होणा-या एका पोस्ट ने खत पाणी दिले आहे. मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होतीय. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्ट वरती फक्त हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे. मात्र या पोस्ट मधून कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत. त्याहून पलीकडे ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनीच शेअर केली आहे. त्यावर हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलयं. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभेची अपक्षाची तयारी करताहेत असेही बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here