दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाचें आणखी एक प्रॉडक्ट बाजारात..!!

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचा दूध संघ म्हणून ओळख असलेल्या दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाने दूधगंगा ड्रिंकिंग वॉटर या नावाने स्वच्छ पाणी बॉटल बाजारात लॉन्च केली आहे. त्यामुळे दूधगंगा ही आता देश विदेशात दूधगंगा ड्रिंकिंग वॉटर या नावाने स्वच्छ पाणी विकणार आहे.

सध्याच्या काळात शुद्ध पिण्याचं पाणी (Mineral Water) ही प्रत्येकाची गरज बनत चालली आहे आणि त्यामुळेच या व्यवसायाची मागणी वाढत असल्याने दूधगंगा ड्रिंकिंग वॉटर बाजारात आले आहे.

राजवर्धन पाटील

संचालक दूध गंगाधर उत्पादक संघ इंदापूर

गेली काही महिन्यांपूर्वी दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने स्वतःचे दूध प्रॉडक्ट बाजारात लॉन्च केले आहेत. त्यामध्ये दूध, पनीर, लस्सी यासहित अनेक प्रॉडक्ट मार्केटमध्ये विक्रीला आले आहेत. या प्रॉडक्ट ला बाजारात चांगली मागणी असून या यशानंतर दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाने दूधगंगा ड्रिंकिंग वॉटर या नावाने पाणी बॉटल बाजारात आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here