विजय शिंदे
पडस्थळ (ता. इंदापूर) येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी अर्ज नोंदणी अभियानाचा शुभारंभ पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी (दि.17) करण्यात आला. या योजनेच्या लाभापासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, असे आवाहन यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
इंदापूर तालुक्यामध्ये या योजनेत महिलांच्या सहभागासाठी मोफत अर्ज नोंदणी अभियान राबविला जात आहे, असे अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले. या अर्ज नोंदणी अभियानासाठी पडस्थळ येथील नवचेतना महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा रेश्मा महेंद्र रेडके, सचिव स्वाती नवनाथ कोळेकर, कोषाध्यक्षा रुक्मिणी हेमंत झेंडे, सीआरएफ अमृता ईश्वर बोंगाणे, लिपिका नयना रेवन गव्हाणे तसेच सखी, जिजाऊ, स्त्रीशक्ती, राजनंदिनी, सावित्रीबाई, संत निरंकारी, भिमाई, सोयरा, तुळजाभवानी, जोगेश्वरी,आदिशक्ती, प्राजक्ता आदी महिला स्वयंसहाय्यता समूह परिश्रम घेत आहेत.
__________________________