सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने इंदापुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन.

विजय शिंदे

इंदापूर येथील सोनाई प्रतिष्ठान यांच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी १८ जुलैपासून नाव नोंदणी सुरू करण्यात आली असून इंदापूर तालुक्यातील इच्छुकांनी या लग्न सोहळ्यासाठी आपले नाव नोंदणी करून सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सोनाई प्रतिष्ठानचे प्रमुख तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी केले आहे.

नाव नोंदणी नंतर शुभमुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या वेळी जोडप्यांना सोनाई प्रतिष्ठानकडून कपडे, सोन्याचे मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी भेट म्हणून देणार असल्याचे प्रवीण माने म्हणाले.यापूर्वीही इंदापूर शहरात सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी रामदास बनसोडे ७२४९३५१९४९, समाधान कोकाटे ८१८००००००२, अक्षय गावडे ७०५७८४३१९४ यांच्याशी संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी ५ ऑगस्टपर्यंत  करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here