विजय शिंदे
उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी भाटनिमगावचे सरपंच अजित खबाले यांनी केली आहे. भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने शेती सोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून किमान पिण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध करावा अशी मागणी खबाले यांनी धरण प्रशासनाकडे केली आहे.
पुणे- नगर- सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाण्याची पातळी चिंताजनक असून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वजा १७ टक्के पाणीसाठा आहे. तर भीमा नदीपात्र मात्र कोरडे पडले आहे, नदीपात्राच्या परिसरात शेती सोबतच मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो, अशावेळी जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न व जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहू शकतो.येत्या दोन-चार दिवसात भीमा नदी पात्रात पाणी सोडावे अशी मागणी त्यांनी केली.
एक मार्चच्या दरम्यान उजनीची पाण्याची पातळी वजा १७ टक्के इतकी होती. उजनीतील पाणी हे आता पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.