विजय शिंदे
वनगळी (इंदापूर) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई, मुंबई) तर्फे घेण्यात आलेल्या डी. फॉर्ममीच्या उन्हाळी परिक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परिक्षेत विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य मिळवले असून निकालात विद्यार्थिनींनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
प्रथम वर्षातील कु. खुशी देवकर (81:10%) प्रथम क्रमांक, कु. अलफिया सय्यद (78.80%) व्दितीय क्रमांक, कु. ऋतूजा नरळे (78.60%) तृतीय क्रमांक उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा अंकीताताई पाटील (ठाकरे), सचिव भाग्यश्रीताई पाटील, संस्थेचे सी.ए.ओ. संतोष देवकर व प्राचार्य डॉ. प्रदिप बोडके, विभागप्रमुख दिगंबर जाधव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.