विजय शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(SP) पक्षाच्या तालुका सरचिटणीस पदी भाटनिमगाव येथील शरद गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुका अध्यक्ष ॲड तेजसिंह पाटील यांनी गवळी यांना नियुक्तीपत्र दिले आहे. बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात युवा नेते योगेंद्र पवार, राष्ट्रवादीचे (SP)तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, यांच्या हस्ते शरद गवळी यांना पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP)प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादीचे विचार गावोगाव पोचवण्यासाठी काम करेल असे गवळी म्हणाले.