रत्नपुरी ता. इंदापूर येथे शेती महामंडळ कामगार व वारसदार यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण; आमदार दत्तात्रय भरणे यांनी भेट घेत मार्ग काढण्याचे दिले आश्वासन.

विजय शिंदे

रत्नपुरी ता. इंदापूर येथे शेती महामंडळ कामगार व वारसदार यांच्या विविध मागण्यांसाठी नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या असून लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून यांच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले.

यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना आमदार भरणे म्हणाले शेती महामंडळाच्या कामगार आणि वारसदारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी मी अधिवेशन तसेच वारंवार महसूल मंत्री यांची भेटी घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

आजच्या उपोषणकर्त्यांच्या मागण्याही लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर मांडून त्या सोडवून घेणार असल्याचा विश्वास उपोषणकर्त्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here