विजय शिंदे
महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ रत्नपुरी मळा व इतर सर्व मळे येथील कामगार व त्यांचे वारसदार यांना राहते घर व दोन गुंठे जागा देऊन पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेद्वारे घरकूल मिळावे या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकार विरोधात उपोषणास बसलेल्या शेती महामंडळ कामगारांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी भेट घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रवीण माने म्हणाले शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत याविषयी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही कामगार बांधवांना दिले आहे.
यावेळी राजेश जामदार, बाळासाहेब गायकवाड, नितीन गोरे आदी उपस्थित होते.