अंकिता पाटील- ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर महाविद्यालयात स्कूल कनेक्ट कार्यशाळेचे आयोजन.

विजय शिंदे

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या शाहीर अमर शेख सभागृहामध्ये शुक्रवार दि. 19 रोजी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात “स्कूल कनेक्ट” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यावेळी बोलताना म्हणाले की अज्ञानातून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे, विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे नेहण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 आणण्यात आलेले आहे. त्याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सकारात्मकपणे पहावे .

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नियोजन व विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. स्कूल कनेक्ट या विषयावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अनुषंगाने विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, भिगवण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, रत्नप्रभादेवी महिला महाविद्यालय बावडा येथील प्राचार्य डॉ. अनिल वावरे, तसेच विज्ञान शाखाप्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला शाखाप्रमुख डॉ. भिमाजी भोर, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सदाशिव उंबरदंड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की,’ नवीन शैक्षणिक धोरण ज्ञानाच्या कक्षा वाढवणारे तसेच उपयोजित असणारे आहे ते व्यवस्थित समजून घेऊन या माध्यमातून आपले ज्ञान कौशल्य जगभर पोहोचविता येईल.’
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,’ नवीन शैक्षणिक धोरण काळाची गरज आहे. परदेशातील शिक्षण व्यवस्थेशी जुळवून घेण्याची आणि पारंपारिक आणि नवीन शिक्षणाच्या गरजांची पूर्तता म्हणून नवीन शैक्षणिक धोरण 2020 आलेले आहे. या धोरणाचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी उपयोग होणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक क्षेत्रातील धोरणांच्या बदलाची माहिती दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी विकासाकरिता लागू केले असून प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी हे धोरण समजून घेऊन आपल्या भविष्याच्या वाटा निश्चित केल्या पाहिजे असे मनोगतात व्यक्त केले.

या कार्यशाळेचे समन्वयक प्रा. शाम सातार्ले यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. भिमाजी भोर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here