उमेदवारचे नाव सुप्रिया सुळे व निशाणी तुतारी फुकंणारा माणूस’ इंदापूर तालुक्यातील गावोगावी बॅनर व रिक्षा द्वारे प्रचार सुरू.

विजय शिंदे

नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नाव व तुतारी हे चिन्ह खा शरद पवार या गटाला मिळाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. परंतु सध्या संपूर्ण देशाचे लक्ष हे शरद पवार यांच्या बारामतीकडे लागले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे बारामतीसाठी नेमके कोण उमेदवार असणार अश्या अनेक चर्चाना सध्या चांगलंच उधाण आलं आहे. अश्यातच बारमारती मध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असणार या संदर्भात बॅनर्स हे झळकले आहेत.

महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार याचा अंतिम निर्णय झाला नाही. पुढील काही दिवसांत याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. अशात बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर इंदापूर तालुक्यातील ग्रामीण व शहर परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याआधीच उमेदवाराचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच इंदापूर शहरात रिक्षा द्वारे प्रचारास सुरुवात झाली असून उमेदवार सुप्रिया सुळे व तुतारी हे चिन्ह गावोगावात पोहोचवण्यासाठी इंदापुरातील शरद पवार गट ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारास सुरुवात झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी स्वतः सुप्रिया सुळे यांनी आपल्या उमेदवारीचा स्टेट्स ठेवला होता. असे असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीचे बॅनर झळकताना पाहायला मिळत आहे. ज्याच्यावर ‘उमेदवारचे नाव सुप्रिया सुळे आणि निशाणी तुतारी फुकंणारा माणूस’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच याच बॅनरवर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो देखील आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची महायुतीकडून बारामती लोकसभेकरिता उमेदवारी जवळपास निश्चित झालीय. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे.बारामतीत नेमकं काय राजकारण रंगणार याकडे सर्वांचे लक्ष हे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here