खडकवासला- निरा डाव्या कालव्याला सोडले जाणार आवर्तन, आवर्तनाबरोबरच उजनी धरणातील कृषी पंपांनाही आठ तास होणार विद्युत पुरवठा; आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती.

विजय शिंदे

आज जिल्हा नियोजन समिती पुणे येथील बैठकी दरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या मांडल्या यावेळी सध्या खडकवासला व निरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. दुसरीकडे मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात पाऊस सध्या झालेला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील खडकवासला व निरा डावा कालव्याला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी व तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी. अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

भरणे यांची मागणी विचारात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही कालव्यांना रविवार 21 जुलैपासून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती पंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.

त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांचा आग्रह पवार यांनी मान्य केल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. त्यामुळे शेतकरी व तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

त्यामुळे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच सध्या शेतात उभे असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे तसेच या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आगामी काळातील शेती सिंचनाचा प्रश्न देखील मिटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

तसेच याच बैठकीत श्री भरणे यांनी उजनी बॅक वॉटर मध्ये शेतकऱ्यांना सद्या 6 तास वीज पुरवठा दिली जाते.ती 8 तास करणेत यावी.
अशी मागणी श्री पवार यांच्याकडे केली असता तात्काळ पालकमंत्री अजितदादा यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांना आठ तास करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे उजनी धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here