दूधगंगा दूध उत्पादक संघाकडून आजपासून नवीन दूध दरवाढ; तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

विजय शिंदे 

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उन्हाळ्यात गाईच्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली होती. ज्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणे देखील मुश्कील झाले होते. मात्र,२१ जुलैपासून इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाने शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये प्रमाणे दरवाढ केली आहे.गाईच्या दूध दरात प्रति लिटरमागे ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मात्र फायदा होणार आहे.

दरवाढीची अंमलबजावणी दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने आज पासून करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना इंदापूर दूधगंगा दूध उत्पादक संघाचे संचालक राजवर्धन पाटील म्हणाले दूधगंगा दूध उत्पादक संघाच्या वतीने आज पासून नवीन दरवाढ लागू झाली आहे, यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती, इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी हा शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय करत असल्याने दूध दरवाढीचा विषय हा प्रपंचाशी निगडित होता आज पासून नवीन दूध दरवाढ लागू झाल्याने याचा फायदा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here