विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील प्रगती विद्यालय लोणी देवकर शाळेचा माजी विद्यार्थी श्रीनाथ शरद उदमले यांची महाराष्ट्र पोलीस दल लातूर या ठिकाणी निवड झाली आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे व राजवर्धन पाटील यांनी श्रीनाथ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अतिशय कष्टातून आणि जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण करून श्रीनाथ यांनी यश संपादन केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे वडील शरद भगवान उदमले हे प्रगती विद्यालय लोणी देवकर येथे कार्यरत आहेत यावेळी लोणी देवकर येथील सर्व ग्रामस्थ तसेच प्रगती विद्यालय लोणी देवकर येथील मुख्याध्यापक जाडकर सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन केले.