उजनी जलाशयातील मच्छीमारांच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचा सत्कार.

विजय शिंदे 

 

उजनी (यशवंत सागर)जलाशयात सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करून हजारो मच्छीमारांचा व्यवसायाला पाठबळ देऊन जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उजनी जलाशयातील शेकडो मच्छीमारांनी राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार  दत्तात्रय भरणे यांचे  कटला जातीचे दोन मोठे मासे देऊन आगळावेगळा सत्कार केला.

उजनी जलशात पहिल्यांदाच इंदापूर आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या वर्षी 2023 -24 मध्ये पहिल्यांदा मत्स्यबीज सोडले. त्यानंतर 2024 25 साठी सलग दुसऱ्यांदा मत्स्यबीज सोडण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची तरतूद करून, दिशाहीन होऊन अधोगतीला चाललेला मासेमारी व्यवसायाला आर्थिक पाठबळ देत नवसंजीवनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचबरोबर उजनी जलाशयातील बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्यासाठी आणि मत्स्यबीज मत्स्य खाद्याची शिकार करणाऱ्या वरती जलसंपदा विभाग, पोलीस प्रशासन, मत्स्य विभाग यांना कठोरात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here