इंदापूर – बेडशिंग रस्त्यावर अपघात; अपघातग्रस्तांना प्रवीण माने यांची मदत.

विजय शिंदे

इंदापूर – बेडशिंग रस्त्याने प्रवास करत असता झालेल्या अपघातग्रस्तांना पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी मदत केली.

रस्त्यावर एकेठिकाणी गर्दी दिसली. काय झाले हे पाहण्यासाठी गाडी बाजूला घेतली असता. दुचाकी वाहन घसरून अपघात झाला असून, यात एक महिला बेशुद्ध असल्याचे समजले यावर तत्परतेने ऍम्ब्युलन्स बोलावून त्या भगिनीस मदत केली असल्याचे माने म्हणाले. या वेळीं माने यांनी तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलला रवाना केले.

दुर्घटना झालेल्या चालकाचे नाव मिथुन काळे असून आपल्या आई, पत्नी व मुलासह ते दुचाकीने प्रवास करत होते. पावसाळ्यात पाणी आणि रस्त्यावर असलेल्या मातीने रस्ते घसरडे होतात यामुळे दुचाकी चालकांनी काळजीपूर्वक वाहने चालवावीत आवाहन प्रवीण माने यांनी केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here